पिंपरी : राज्यात मराठी भाषा पंधरवडा साजरा होत आहे. त्या निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्यावतीने इंग्रजी माध्यमातून शिकणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मराठी वाचन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते नववी अशा दोन गटांत ही स्पर्धा पार पडली. यावेळी विद्यार्थी , पालक आणि शाळांचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.