मुंबई: अभिनेत्री काव्या थापरला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर दारू पिऊन गाडी चालवण्याचा आणि एका पादचाऱ्याला धडक दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी काव्याला थांबण्याचा इशारा करताच तिने पोलिसांशी हुज्जत घातली. अपशब्द वापरले. तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
काव्या प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसते. तिचा यांचा जन्म २० ऑगस्ट १९९५ रोजी महाराष्ट्रात झाला. तिने बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे आणि ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे.
काव्या प्रथम ‘तत्काळ’ या हिंदी लघुपटात दिसली होती. पतंजली, मेक माय ट्रिप अशा अनेक मोठ्या ब्रँडसाठी तिने जाहिराती केल्या आहेत.