
पिंपरी : अखिल महाराष्ट्र बुरुड समाज संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती श्यामलाताई सोनवणे यांचे पती मच्छिंद्र शंकरराव सोनवणे (वय ७४ वर्षे ) यांचे आज (गुरूवारी) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
कै.सोनवणे हे श्यामलाताईंच्या माध्यमातून बुरुड समाजाचे एक आधारस्तंभ होते. लष्करी वायुदला (एअर फोर्स ) तून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी फिनोलेक्स कंपनीत सेवा बजावली. यानंतर त्यांनी फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला. आपल्या प्रेमळ व मीतभाषी स्वभावाने त्यांनी लोकांच्या मनात आपला ठसा कायम कोरला. खऱ्या अर्थाने ते स्त्रीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. श्यामलाताईंच्या सामाजिक, राजकीय वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या जाण्याने केवळ सोनवणे घराण्याची नव्हे तर बुरुड समाजाची हानी झाली आहे. त्यांच्या मागे पत्नी श्यामलाताई यांच्यासह मुली,मुलगा,जावई व नातवंडे असा परिवार आहे.