Home Pimpri-Chinchwad मंत्री गिरीश महाजन, खासदार धनंजय महाडीक यांच्याकडून दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

मंत्री गिरीश महाजन, खासदार धनंजय महाडीक यांच्याकडून दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

0
मंत्री गिरीश महाजन, खासदार धनंजय महाडीक यांच्याकडून दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांचे सांत्वन<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

पिंपरी : ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, खासदार धनंजय महाडीक, आमदार निलेश लंके, आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार मोनिका राजळे, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार अमर साबळे यांच्यासह सामाजिक, बांधकाम व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुक्रवारी (दि. ६) चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन स्वांत्वन केले.

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ३ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी राज्याचे ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, खासदार धनंजय महाडीक, आमदार निलेश लंके, आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार मोनिका राजळे, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार अमर साबळे, बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल, नगर बँकेचे संचालक अभय आगरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, मुलगी ऐश्वर्या रेणुसे-जगताप, बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप आणि कुटुंबियांचे सांत्वन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here