
शिवसेना उपनेते मा खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे करणार मार्गदर्शन
पिंपरी (प्रतिनिधी) – भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिकांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्या गुरुवारी (दि.18) दुपारी एक वाजता जनसंवाद’ चे आयोजन केले असून सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांना शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख तथा शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत,व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेणार आहे अशी माहिती शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव यांनी दिली.
भोसरीच्या पीएमटी चौकातील श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्था कार्यालयात शिवसैनिकांसोबत सर्वसामान्य नागरिकांशी जनसंवाद आयोजित केला आहे. यामध्ये शिवसैनिकांना भोसरी विधानसभेतील विविध प्रश्न, आगामी महापालिका निवडणुका, शिवसेना पक्ष वाढीसाठी संघटन, नवीन पदाधिका-यांच्या नियुक्त्या, कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश आदी विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. त्याशिवाय शिवसैनिकाच्या अडीअडचणी जाणून घेण्यात येणार आहे.
सर्व सामान्य नागरिकांनी देखील आपल्या काही समस्या असतील तर प्रत्यक्ष मा. शिवाजीराव आढळराव पाटील, मा. खासदार, उपनेते यांना कार्यालयात दिलेल्या वेळेत प्रत्यक्ष येऊन भेटावे तसेच अधिक माहितीसाठी भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव मो.नंबर 8624866633 यांच्याशी संपर्क साधावा.
भोसरी विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी, सर्व प्रभागातील शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, महिला आणि युवा पदाधिकारी यांच्यासह सर्व शिवसैनिकांनी उपस्थितीत राहावे, असे आवाहन विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव यांनी केले आहे.