खरगपूर: वृत्तसंस्था
जगातील सर्वोत्तम ५० वृत्तसंस्थांच्या यादीमध्ये एकाही भारतीय संस्थेचा समावेश नसणे ही बाब खेदकारक असून याचा गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले. येथील आयआयटी संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भारताला ज्ञानदान आणि ज्ञानोपासने ची दीर्घ परंपरा आहे. सर्वोत्तम संस्थांच्या यादीत नामांकन असणे हे गुणवत्तापूर्ण शिक्षणा एवढे महत्त्वाचे नाही. मात्र, या नामांकनामुळे विद्यार्थी संबंधित शिक्षण संस्थेकडे आकृष्ट होतात आणि जगभरातील गुणवत्ताधारक अध्यापकही या संस्थेत काम करण्यास उत्सुक असतात. याहूनही महत्त्वाचे म्हणजे अशा नामांकित संस्थांमुळे देशाची मान उंचावली जाते. त्यामुळे सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या जागतिक पातळीवरील यादी भारतीय संस्थांचा समावेश व्हावा, यासाठी गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले.