
मुंबई: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष हा भाकड आणि बेकड पक्ष आहे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. भाजप हा खंडणीखोरांचा पक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, खासदार संजय राऊत आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढणार आहे.
भारतीय जनता पक्षाला एकही नेता घडवता आला नाही. इतर पक्षातील नेते आयात केले आहेत. अशा अर्थाने भाजप हा भाकड पक्ष आहे. दुसरीकडे आपला पक्ष वाढविण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांवर धाडी घालण्याच्या आणि गजाआड करण्याच्या कारवाया भाजपच्या सरकारने केल्या आहेत. त्यामुळे तो भेकड पक्ष आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पक्ष, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी गणराज्य पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी असे अनेक पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीत सहभागी झाले आहेत. आंबेडकरी विचाराच्या अनेक संघटनाही आमच्यासोबत आल्या आहेत. आम्ही आता आघाडी म्हणून एकसंधपणे निवडणूक लढविण्यास सज्ज आहोत असे जयंत पाटील यांनी सांगितले.
मतदारसंघ निहाय महाविकास आघाडीचे जागावाटप
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि मुंबई उत्तर. या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार असणार आहे.
बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड हे मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढविणार आहे.
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजी नगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशीम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य या जागा शिवसेना ठाकरे गटाने