-माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांची उपस्थिती
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहरातील पक्षाचे विस्तारक आणि प्रमुख पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. ‘बूकिंग ऑफ व्होट’संकल्पनेनुसार शहरात काम करण्याची सूचनाही दिली.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपाचे १०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी ‘यंदाचा निर्धार भाजपा 100 पार’ असा निर्धार करत शनिवारी भाजपाची विस्तारक कार्यशाळा उत्साहात पार पडली.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, रवींद्र अनासपुरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, राजू दुर्गे, विजय फुगे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर शैलजा मोरे, शहर उपाध्यक्ष नंदकुमार दाभाडे, नगरसेवक संदीप कस्पटे, राजेंद्र लांडगे, मंडल अध्यक्ष विजय शिनकर, नंदू भोगले, संजय पटनी, संजय परळीकर, अमेय देशपांडे, देविदास पाटील, देवदत्त लांडे, मधुकर बच्चे, विशाल वाळुंजकर, आशा काळे, गणेश ढाकणे, प्रदीप बेंद्रे, मुक्ता गोसावी, दिलीप गोसावी, पूजा आल्हाट, अमेय देशपांडे, धनंजय शाळीग्राम, नंदू कदम, बिभीषण चौधरी, विक्रम कलाटे, मुकेश चुडासमा, नंदू दाभाडे, कविता हिंगे, राजश्री जायभाय, दीपाली, धानोकार, रेखा कडाली, पुष्पा सुबंध, आबा कोळेकर, कैलास सानप, सुधीर चव्हाण, गीता महेंद्र, सचिन राऊत, गणेश वाळुंजकर, कोमल काळभोर, गायत्री तळेकर आदी उपस्थित होते.
संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी प्रास्ताविक केले.
**
नगरसेवक संदीप कस्पटे यांचा आदर्श…
भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संदीप कस्पटे यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील महापालिका मासिक वेतन भारतीय सैन्य निधीत जमा करण्यासाठी पक्षाकडे १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमदार जगताप यांनी संदीप कस्पटे यांचे कौतूक केले.
**
श्री कलाटे यांचा भाजपात प्रवेश…
वाकड येथील कट्टर शिवसैनिक सुरेश एकनाथ कलाटे यांचे चिरंजीव श्रीनिवास उर्फ श्री कलाटे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कलाटे यांचे पक्षात स्वागत केले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षकार्यात सक्रीय राहणार आहे, असे मत यावेळी श्री कलाटे यांनी व्यक्त केले.