
पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरातील महिलांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी .नड्डा , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांचा सत्कार केला. महिला आरक्षण विधेयक मंजूर केल्याबद्दल, संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण धोरण जाहीर झाल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.
आज महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षातर्फे पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (COEP) येथे या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे निमंत्रक राज देशमुख, डॉ.सुकुमार आणि भाजपा प्रवक्ते अली दारूवाला हे होते.
डॉ.सुचेता भिडे-चापेकर,शमा भाटे, स्वाती मुजुमदार, सरिता वाकलकर, भाग्यश्री पाटील, स्मिता घैसास, देवयानी मुंगली, रचना रानडे, आर पी मोरे, सुनयना होले, सुप्रिया बर्वे अशा विविध क्षेत्रातील मान्यवर २२ महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.