पिंपरी : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त एकनाथदादा पवार सोशल फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे . सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा व रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.
रविवार दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ९:०० ते साय ७:००. या वेळेत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान पूर्णानगर येथे रक्तदान शिबीर होणार आहे
पूर्णानगर, संभाजीनगर, शाहूनगर, शिवतेज नगर ,शिवाजी पार्क, महात्मा फुलेनगर, कृष्णानगर ,शरद नगर ,घरकुल ,कोयना नगर मधील नागरिक व एकनाथदादा पवार सोशल फाउंडेशन हे सदर रक्तदान शिबिराचे आयोजक आहेत.