इरफानभाई सय्यद..कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहरात पक्षाला ‘ अच्छे दिन ‘… घुसमठ होत होती. बाहेर पडलो तर, खोके सरकार, मिंदे सरकार, गद्दार, असे आमच्यावर आरोप केले गेले. ज्याप्रमाणे जुगारात हरलेला माणूस वाटेल तसा बडबडतो तशी परिस्थिती काही लोकांची झाली होती. त्या लोकांच्या मनात असे विचार का आले? आहो ५५ पैकी ४० लोकं बाहेर पडतात, असे कसे झाले? राजा आंधळा होतो, तेव्हा प्रधानालाच सत्तेची सूत्रं हाती घ्यावी लागतात. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आपले प्रधान आहेत. त्यांच्या साथीला साथ देत आपल्याला पुढील येणारी अनेक वर्षे त्यांची ढाल बनून बाळासाहेबांचे विचार अमर करायचे आहेत, त्यासाठी पुन्हा एकदा उठा, संघर्ष करा एकत्रित व्हा. तरच आपण बाळासाहेबांचे सच्चे पाईक होऊ ”, असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.राष्ट्रवादीपासून संरक्षण करा. आम्हाला शांततेत जगू द्या. एवढीच मागणी केली होती. आपल्याच सभापतीच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. त्यावेळी देखील मी उद्धवजींना सरकार आपल आहे. तुम्ही मुख्यमंत्री आहात. त्यांना सांगा असे समजावले होते. मात्र आमचे त्यांच्यापुढे काहीच चालले नाही. आता राज्यात आपली सत्ता आहे. त्यामुळे निर्णय जाग्यावरच होतील. कुणाकडेही जायची गरज नाही. दिल्लीश्वराची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या कॉंग्रेसी विचारधारेच्या विरोधात बाळासाहेबांनी अखेरपर्यंत लढा दिला व समाजहिताचे कार्य केले. स्वर्गीय शिवसेना प्रमुख, हिन्दुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला प्रमाण माणून कार्य करणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला अनेक नेते मंडळी व कार्यकर्ते जोड़ली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपले मार्गदर्शक एकनाथजी शिंदे साहेबांकडून आपल्या पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत त्यांच्या कार्याचा आवाका पाहुन राज्यभर जसे मोठ्या प्रामाणावर कार्यकर्ते पक्षा बरोबर जोड़ले जात आहेत. तसेच आता पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेला आणखी उभारी मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळलंच. मात्र पिंपरी चिंचवड शहरातील आघाडीतील पक्षांना आणखी धक्के बसणार आहेत. पुढील काही दिवसात इतर पक्षांचे नगरसेवक आणि पदाधिकारीही पक्ष प्रवेश करतील. पिंपरी चिंचवड महापालिका मित्र पक्षासह आपल्याला काबीज करायाची आहे. पुढील काळात कामाच्या निकशावरून योग्य तो पदभार,जबाबदाऱ्या देण्यात येतील असेही पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी यांना सूचित करून निवडणुका कधीही लागू शकतात. त्यासाठी सज व्हा, असे आवाहन इरफानभाई यांनी केले. हेच मुख्यमत्री राहतील. कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला आणखी उभारी मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Home Pimpri-Chinchwad बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाला ‘दे धक्का’.. शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहरात पक्षाला ‘ अच्छे दिन ‘