
पिंपरी – खराळवाडी येथे शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षा संदर्भात करिअर करण्यासंदर्भात ओझर्डे इन्स्टिट्यूट चे संचालक भूषण ओझर्डे यांचे व्याख्यान राष्ट्रीय बाल दिनानिमित्त, उर्दू कौन्सिल पिंपरी चिंचवड यांच्या नॅशनल अँग्लो उर्दू स्कूलने आयोजित केले होते.
सर्व विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता असते. मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांतानुसार अनेक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असते ती ओळखून त्यामध्ये लहानपणापासून विचार करून करिअर केल्यास करिअरला व्यवस्थित दिशा मिळते, ओझर्डे इन्स्टिट्यूट मधून आज पर्यंत अगदी लहान वयात शेकडो अधिकारी घडले आहेत, असे व्याख्यानामध्ये दाखले देत ओझर्डे इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक भूषण ओझर्डे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.
यावेळी पुणे मेट्रो इंजिनियर सचिन आढागळे तसेच एडवोकेट हरीश कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या व्याख्यानाचा मोठ्या प्रमाणात बाल विद्यार्थांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नईन हनीफ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापिका मीना सूर्यवंशी यांनी करून दिला. आभार प्रदर्शन माननीय लतीफ पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन अबिद शहा, शेख अशफक, तौफिक झुबेरी तसेच अतिक सय्यद यांनी केले.