Home Uncategorized बार्टी फेलोशिपचा प्रश्न मार्गी लावण्याचे मुख्य सचिवांचे आश्वासन, वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुढाकाराने ७७ दिवस आंदोलन

बार्टी फेलोशिपचा प्रश्न मार्गी लावण्याचे मुख्य सचिवांचे आश्वासन, वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुढाकाराने ७७ दिवस आंदोलन

बार्टी फेलोशिपचा प्रश्न मार्गी लावण्याचे मुख्य सचिवांचे आश्वासन, वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुढाकाराने ७७ दिवस आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी

वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा व प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनानुसार वंचित बहुजन युवा आघाडीचे पुढाकाराने ७७ दिवस आंदोलन करणारे बार्टी फेलोशिप विद्यार्थ्याचा प्रश्न प्रदेश पदाधिकारी ऋषीकेश नांगरे पाटील व विशाल गवळी ह्यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक ह्यांचे कडे नेला असून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले आहे.

वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने बार्टी फेलोशिप ही २०२१ व २०२२ सरसकट आणि डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून मिळाली पाहिजे, या मागणी संदर्भात मंत्रालयात मुख्यसचिवांची भेट घेतली.

यावेळी बार्टी मुख्यालयासमोर गेली ७८ दिवस उपोषणकर्ते विद्यार्थी प्रतिनिधी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य ऋषिकेश नांगरेपाटील प्रदेश सदस्य वंचित विशाल गवळी प्रामुख्याने चर्चेत सहभागी होते. मुख्यमंत्र्यां सोबत चर्चा करून पुन्हा बैठक लावण्याचे आश्वासन मुख्य सचिव ह्यांनी शिष्ट मंडळाला दिले.