सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य विभागातील अभ्यासक्रमामध्ये इंटरनशिप अंतर्भूत केली आहे. प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील वाणिज्य विभागाअंतर्गत तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटरनशिप कार्यक्रम सुरू केला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर हे उपस्थित होते. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक अभ्यासक्रमाबरोबरच विविध कौशल्य अंगीकारली पाहिजेत असे मत व्यक्त केले. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये विविध कौशल्य आधारित, अल्प कालावधीतील अभ्यासक्रम शिकवले जातात त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माय एस. पी. अकॅडमी पुणे येथील मुख्य अधिकारी श्री. अक्षय रायचुरे, डिजिटल विपणन प्रमुख श्री. पवन जाधव, विपणन प्रमुख श्री. अमन राजपूत हे उपस्थित होते.
यावेळी इंटरनशिप कार्यक्रमांमध्ये अंतर्भूत असणाऱ्या व्यक्तिमत्व विकास, नोकरी संदर्भ मार्गदर्शन, प्रत्यक्ष अनुभव इत्यादी संदर्भात सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ पद्मावती इंगोले यांनी केले. इंटर्नशिप कार्यक्रमाचे समन्वयक डॉ रामदास लाड यांनी सूत्रसंचालन केले तसेच उपस्थित त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. बी.जी. लोबो, डॉ. एच. बी. सोनावणे, डॉ. एस डी जगताप, डॉ कृष्ण शिंदे, प्रा. स्मिता एरंडे आदी उपस्थित होते.