
चिंचवड – पूर्णानगर येथे बारावीनंतर करियरच्या कोणत्या दिशा आहेत, त्याची कशी तयारी संदर्भात ओझर्डे इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा.भूषण ओझर्डे यांचे व्याख्यान ए.एस.एम कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथील बारावीच्या फेरवेल कार्यक्रमात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सर्व विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता असते. मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांतानुसार अनेक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असते ती ओळखून त्यामध्ये विचार करून करिअर केल्यास करिअरला व्यवस्थित दिशा मिळते, ओझर्डे इन्स्टिट्यूट मधून आज पर्यंत अगदी लहान वयात शेकडो अधिकारी घडले आहेत, असे व्याख्यानामध्ये दाखले देत ओझर्डे इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक भूषण ओझर्डे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.
यावेळी ए.एस.एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर व्हि.पी. पवार हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.अपर्णा मोरे व इतर सहकारी उपस्थित होते.
या व्याख्यानाचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थांनी लाभ घेतला. आयुष्याला दिशा देणाऱ्या बारावीच्या या टप्प्यावर या मार्गदर्शन चा लाभ विद्यार्थ्यांना झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.