हिंदुस्तानच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रहाटणी येथील साईलीला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिराला भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, महिला बाल कल्याण समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभापती नगरसेविका सविताताई खुळे, नगरसेवक बाबा त्रिभुवन ,स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर ,भारतीय जनता युवा मोर्चाचे चिंचवडचे अध्यक्ष देविदास तांबे, रहाटणी विभागातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खुळे ,नरेश आप्पा खुळे ,गणेश नखाते, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी संतोषशेठ कलाटे, प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक नवीनशेठ लायगुडे ,साईलीला सोसायटीचे अध्यक्ष राहुल मोहर, प्रमोटर्स व बिल्डर्स श्रीयुत गेहानी, स्वराज नागरिक पतसंस्थेचे चेअरमन श्री.सुनील कुंजीर व सोसायटीचे सभासद व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .
रक्तदान हेच श्रेष्ठदान हा मंत्र मानून रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यांना श्री.देवीदास तांबे यांच्या वतीने पेन ड्राईव्ह असलेले आकर्षक पेन सप्रेम भेट देण्यात आले. सदर शिबिरात 100 नागरिकांनी रक्तदान केले.