पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी, पुणे येथील हिंदवी संजय राणे हिची प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथ राजपथ दिल्लीला होणा-या संचलनासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार साहेब यांनी तिचे कौतूक केले. तर संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे साहेब व मानद सचिव अॅड. संदीप कदम साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य व अधिष्ठता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डाॅ. एम. जी. चासकर यांनी अभिवादन केले.
महाराष्ट्रातून दिल्ली येथे होणा-या संचलनासाठी 116 कॅडेसची निवड झाली आहे. त्यात पुणे ग्रुपमधून उप कॅडेटसची निवड झाली त्यामध्ये 2 महाराष्ट्र बटालियनच्या 13 कॅडेट्सची निवड झाली. अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, मुंबई आणि पुणे ग्रुप हेड क्वार्टसचा यामध्ये समावेश असतो. हिंदवी संजय राणे ही प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी व 2 महाराष्ट्र बटालियन एनसीसीची छात्र आहे. हिंदवी राणे हिने 3 महिन्यांच्या कार्यकाळात 10 दिवसांचे एक अषी 10 शिबिरे पूर्ण केली. या शिबिरामध्ये मेहनत, परिश्रम व ड्रील ची नियमित सराव करुन तिची दिल्ली येथे होणा-या संचलनासाठी निवड झाली. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी, पुणे एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर, 2 महाराष्ट्र बटालियन एनसीसी तसेच पिंपरी चिंचवड शहराचे नाव उंचावले आहे.
महाविद्यालयात मागील वर्षी एनसीसीचे नविन युनिट सुरु झाले आणि पहिल्याच वर्षी महाविद्यालयातील विद्यार्थीनीची दिल्ली येथे होणा-या संचलनासाठी निवड होणे ही महाविद्यालयासाठी व संस्थेसाठी कौतुकास्पद व अभिमानाची गोष्ट आहे. असे मत प्राचार्य एम. जी. चासकर यांनी व्यक्त केले.
नवीन युनिट सुरु झाल्यावर पहिल्याच वर्षी एवढे अभूतपूर्व यश मिळणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. असे तर एनसीसी युनिटचे प्रमुख लेफटनंट डाॅ. ज्ञाज्ञानेश्वर चिमटे यांनी व्यक्त केले. तर कर्तव्यपथ दिल्ली येथे होणा-या संचलनासाठी माझी निवड होणे यामध्ये माझे कुटूंबीय, महाविद्यालय, प्राचार्य, एनसीसी विभाग प्रमुख व महाविद्यालयातील सर्वाचा महत्वाचा वाटा आहे. खूप कठोर मेहनतीनंतर ही संधी मिळणे हे स्वप्न आहे अशी प्रतिक्रिया हिंदवी राणे हिने दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एम. जी. चासकर उपप्राचार्य डाॅ. बी. जी. लोबो व डाॅ. एच. बी. सोनवणे महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व आजी माजी विद्यार्थी यांनी तिचे अभिनंदन केले व संचलनासाठी शुभेच्छा दिल्या.