
पुणे : प्रतिनिधी
पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.अरविंद लाभशेटवार यांना जाहीर झाला असून पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीच्या १६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल शेरेटन ग्रँड येथे होणाऱ्या १६ व्या वार्षिक परिषदेत हा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर तसेच डॉ.संतोष होनावार, डॉ.संतोष अगरवाल यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
डॉ.अरविंद लाभशेटवार हे गेली ४५ वर्षे नेत्रशल्य चिकित्सा क्षेत्रात कार्यरत आहेत. बी.जे. मेडिकल कॉलेज (ससून हॉस्पिटल)चे अधिष्ठाता म्हणून तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ (नांदेड) मध्ये वेगवेगळ्या पदांवर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ३५ हजारहुन अधिक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या आहेत. त्यात मोतीबिंदू तसेच बुबूळ नेत्ररोपण शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मंदार परांजपे, सचिव डॉ. सागर वर्धमाने, खजिनदार डॉ.पंकज बेंडाळे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. डॉ.अरविंद लाभशेटवार यांनी पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्षपदाची जबाबदारीही यापूर्वी सांभाळली असून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यात ‘असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल असेम्ब्ली कम्युनिटी ऑफ्थल्मॉलॉजि’ च्या प्रोफेसर ईश्वरचंद्र मेमोरियल बेस्ट टीचर इन ऑफ्थल्मॉलॉजी अवॉर्ड चा समावेश आहे .