Home Pune पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने सत्कार

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने सत्कार

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या वतीने सत्कार<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

पुणे : प्रतिनिधी

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने पुंणे श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा, तसेच पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या पत्रकारांचा ‘सूर्यगौरव सन्मान २०२३’ देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह, सुवर्णपदक व स्कार्फ असे या सत्काराचे स्वरूप होते. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या हस्ते मान्यवर पत्रकारांना गौरविण्यात आले. यावेळी ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, महासंचालक प्रा. डॉ. शैलेश कुलकर्णी, संचालक प्रशांत पितालिया आदी उपस्थित होते.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, उपाध्यक्ष स्वप्नील शिंदे व उमेश शेळके, सरचिटणीस सुकृत मोकाशी, खजिनदार अंजली खमितकर, चिटणीस प्रज्ञा केळकर व पूनम काटे, कार्यकारिणी सदस्य हर्ष दुधे, वरद पाठक, विक्रांत बेंगाळे, शहाजी जाधव, श्रद्धा सिदीड, विनय पुराणिक, गणेश राख, संभाजी सोनकांबळे, शंकर कवडे, भाग्यश्री जाधव यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच अश्विनी सातव-डोके, गोविंद वाकडे, संजय ऐलवाड, अरुण म्हेत्रे, नितीन पाटील, सम्राट कदम यांचा उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. समाजाच्या हितासाठी, देशाच्या प्रगतीसाठी पत्रकार म्हणून आपण भरीव योगदान देता आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघ ही पुण्यातील पत्रकारांची शिखर संस्था आहे. या संस्थेवर निवडून जाणे ही अभिमानाची गोष्ट आहे. पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात. ‘सूर्यदत्त’ संस्था या उपक्रमांत आपल्यासोबत आहे. पत्रकारांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.”

उषा काकडे यांनीही उपस्थित सर्व पत्रकारांना चांगल्या कारकिर्दीसाठी, तसेच समाजहिताची पत्रकारिता करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. डॉ. शैलेश कुलकर्णी यांनी ‘सूर्यदत्त’च्या वतीने पत्रकारांसाठी व समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी सांगितले. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here