पुणे : पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. यावेळी एकूण 113 जागा भरण्यात येणार आहेत. दरम्यान कोणती पदे भरली जाणार आहेत? त्यासाठी पात्रता काय असेल? अर्ज करण्याची मुदत काय? याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात.
प्राध्यापक पदाच्या सात जागा आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता MD/MS/DNB आणि तीन वर्षे अनुभव आवश्यक आहे. तर सहयोगी प्राध्यापक पदाच्या 12 जागा असून यासाठी शैक्षणिक पात्रता MD/MS/DNB आणि 05 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 31 जागा असून यासाठी शैक्षणिक पात्रता MD/MS/DNB आणि एक वर्ष अनुभव आवश्यक आहे. तर सांख्यिकीतज्ज्ञ पदाच्या दोन जागा असून यासाठी शैक्षणिक पात्रता जाहीर करण्यात आलेली नाही.
ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर पदाच्या 16 जागा असून, यासाठी शैक्षणिक पात्रता MBBS आहे. तर सिनियर रेसिडेंट पदाच्या 12 जागा असून, यासाठी शैक्षणिक पात्रता MD/MS/DNB आहे.
ज्युनियर रेसिडेंट पदाच्या 30 जागा आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता MBBS आहे. तर अपघात वैद्यकीय अधिकारी पदाच्या तीन जागा असून यासाठी शैक्षणिक पात्रता MBBS आणि पाच वर्षे अनुभव आवश्यक आहे.
खुल्या प्रवर्गासाठी अर्ज करण्याची फी 500 रूपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 300 रूपये आहे. ऑनलाईन करण्याची मुदत 20 जुलै 2022 देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.pmc.gov.in/mr पाहा.