Home Pimpri-Chinchwad पीसीएमसी १००भ्रष्टाचार की एक बात” या मालिकेतील सातवा भाग आपण आज पाहणार आहोत.स्टेशनरी बाजार भावापेक्षा जास्त दराने खरेदी घोटाळा प्रकरण.

पीसीएमसी १००भ्रष्टाचार की एक बात” या मालिकेतील सातवा भाग आपण आज पाहणार आहोत.स्टेशनरी बाजार भावापेक्षा जास्त दराने खरेदी घोटाळा प्रकरण.

0

पिंपरी चिंचवड महापालिकेत असे कोणते क्षेत्र  किंवा विभाग नाही की ज्यामध्ये अनियमितता आढळून आली नाही. भ्रष्ट व्यवहार करत असताना साधे बाजारभाव  पडताळून पाहण्याची आवश्यकता वाटू नये ही खेदाची बाब दिसून येते. स्टेपलर आणि पिंन पाकीट खरेदीमध्ये सुद्धा जास्त दर देऊन महापालिकेचे सरळ नुकसान केल्याचे आता उघड झाले आहे.

मध्यवर्ती भांडार विभागातर्फे सन २०१०-११ करिता मनपास लागणारे लेखन साहित्य पुरवण्याचे आदेश म भां/५/क वि/१०३/२०११ दिनांक १८/०३/२०११ अन्वये मे अजिंक्य कॉपियर्स अँड स्टेशनर्स यांना देण्यात आले. खालील नमूद केलेले लेखन साहित्य हे त्याचे बाजारात काय भाव आहेत हे खात्याने मागवून घेतले होते व त्यामुळे त्यामध्ये मोठी तफावत आढळून आली.ह्या मोठया किमतीच्या फरकामुळे एकूण ३३४००.०० रुपये ठेकेदारास जास्त प्रदान केले गेले.
  स्टेपलर जे बाजारात ६२ रुपयांना मिळत होते ते मनपा भांडार कक्षाने ते ७२ रुपयांनी विकत घेतले.एकूण ५०० स्टेपलर्स विकत घेतल्यामुळे महापालिकेस ५०००.०० रुपयांचे सरळ नुकसान दिसून आले.
त्याचप्रमाणे स्टेपलर पिनच्या एका पॅकेट्स ची किंमत बाजारात ८.९० रुपये असताना भांडार कक्षाने ती २० रुपये प्रति पॅकेट ने खरेदी केले.सदर १५०० पॅकेट्स खरेदी केल्यामुळे १६६५०.०० रुपये मनपाला जास्त अदा करावे लागले.
डिंक बाटली १५० एम एल ची किंमत बाजारभाव प्रमाणे १६.५० रुपये असताना ती २८.२५ रुपयांनी खरेदी केली गेली.एकूण १००० नग डिंक बॉटल खरेदी केल्यामुळे पालिकेचे एकूण ११७५०.०० नुकसान झाले.असे एकूण ३३४००.०० रुपयांचे अतिरिक्त देणे ठेकेदारास अदा केले गेले. स्टेपलर आणि डिंक बाटलीत जर तीस हजारापेक्षा जास्त रक्कमेचा घोळ असेल तर इतर स्टेशनरी खरेदी मध्ये लाखो रुपयांची हेराफेरी केली गेली असेल हे सत्य नाकारता येत नाही.एका वर्षाच्या स्टेपलर खरेदीमध्ये २२००० रुपये जास्त अदा केले असतील तर मागील १० वर्षात दोन लाखापेक्षा जास्त रक्कमेवर पालिकेला पाणी सोडावे लागले असेल. त्यामुळे मागील १२ वर्षात झालेल्या स्टेशनरी खरेदीचे परीक्षण माननीय आयुक्त यांनी एक एक उच्चअधिकारी नेमून करावे.व मध्यवर्ती भांडार कक्षाच्या त्या घोटाळेबाज अधिकाऱ्यांनवर कारवाई करावी.
विजय व पाटील