
एम.एस.एम.ई. उद्योगांच्या संकटावर मात करण्यासाठी उद्योगक्षेत्र संघटीतपणे लढणार
चिंचवड – आज चेंबरच्या १८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने उद्योजकांची बैठक ‘हॉटेल’ भोला’, एम.आय.डी.सी., चिंचवड, पुणे -१९ येथे संपन्न झाली. चेंबरच्या १७ वर्षातील कार्याचा आढावा संस्थापक अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब शिंदे यांनी मांडला. आजपर्यंत एल. बी. टी. कायदा रद्द करणे, माथाडी कायद्यात सुधारणा, जी. एस. टी., प्राप्तीकर कायद्यातील अडचणी सोडवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला, औद्योगिक प्रदर्शने भरवलीत.
आज पिंपरी चिंचवड एमआयडीसीला स्वतंत्र औद्योगिक नगरीचा अध्यादेश ३० वर्षे प्रलंबित पुर्णत्वास नेणेसाठी प्रयत्न करणार. एमआयडीसीच्या जवळच्या चिखली, कुदळवाडी, मोशी परिसरात असंख्य एम. एस.एम.ई. उद्योगांवर झालेली ‘भुईसपाट ‘ वृत्तीचा जाहीर विरोध आणि नाराजी उद्योजकांनी केली. यासाठी एम.आय.डी.सी.तील सर्व संघटना एकत्रीतपणे उद्योगांवर महापालिकेने लादलेले अस्मानी संकटापूर्वी, काही कालावधी आणि संधीची मर्यादा न देता एकप्रकारे ‘हातोडा मारला’ असे दिसते आहे.
चेंबरची कार्यकारिणी सन २०२५ – २६ ते २०२९ – ३० पर्यंत निवडली ती खालीलप्रमाणे :-
१) अध्यक्ष : प्रेमचंद आर. मित्तल २) उपाध्यक्ष : रामदास माने
३) सचिव : विनोद शिवनारायण बन्सल
४) खजिनदार : प्रशांत रंगनाथ गोडगे-पाटील
५) कार्यकारिणी सदस्य : (१) सुरेश वाढोकार, (२) व्ही.एस. काळभोर, (३) पी.के. जॉर्ज, (४) प्रदीप वैद्य (५) विक्रम सावंत, (६) राजकुमार अगरवाल (७) सागर शिंदे (८) व्ही.एम. शिंदे, (९) नेलवीन वर्गीस हे होत.
चेंबरच्या पुढील काळात एम.एस.एम.ई. अधिक समृध्द, कायदयाने सक्षम आणि सरकारी औद्योगिक कायदयाबाबत ज्ञान आणि संकटकाळी कायदयाच्या चौकटीत उभे राहणेकामी क्षमता वाढविणेसाठी, संघटीत प्रयत्न करत असे. चेंबरचे नवीन अध्यक्ष, प्रेमचंद मित्तल यांनी उपस्थित उद्योजक समुदायास मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव विनोद शिवनारायण बंसल यांनी केले, आभार प्रदर्शन नंदु शिंदे यांनी मानले.