दि.१८/११/२०२२ : मातंग साहित्य परिषदेच्या वतीने आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात काळेवाडी,पिंपरी,पुणे येथील राजवाडा लॉन्स येथे एक दिवशीय मातंगऋषी साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार, दि.२०/११/२०२२ रोजी विवेकवादी विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ८ ते सायं ७.००वाजे पर्यंत संपन्न होत आहे.ह्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपते प्रमुख,मा.कृष्णकुमार गोयल हे आहेत.संमेलनाचे उद्घाटन डॉ.प्रशांत नारनवरे (आयुक्त,समाजकल्यान,महाराष्ट्र राज्य) करणार आहेत.संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून समस्त साहित्य परिषदेचे मुख्य कार्यवाह प्रसन्न पाटील,बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये,ज्येष्ठ कवि उध्दव कानाडे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात विविध सत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते संदीप पाठक यांची प्रकट मुलाखत साहित्यीक मा.गणेश खंडाळे घेणार आहेत. मातंगऋषी ह्या विषयावर डॉ. अंबादास सकट यांच्या अध्यक्षतेखाली व साहित्यीक संपत जाधव, मातंगऋषीचे चरित्रकार दिगंबर घंटेवाड यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. गझल मुशायरा हा पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ गझलकार रघुनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या गझलमुशयरामध्ये मा.सुहास घुमरे,डॉ. अविनाश सांगोलेकर मा. संतोष कांबळे विजय वडवेराव, मीना शिंदे, संदीप जाधव, डॉ. नरसिंग इंगळे, नीलेश शेंबेकर, सरोज चौधरी, संजय खोत, गणेश भुते, आदेश कोळेकर, चंद्रकांत धस ह्यांचा सहभाग असणार आहे.
प्रा. मुबीन तांबोळी यांचे ‘भारतीय कौटुंबिक संस्कृती आणि आपण’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.. मा. रवींद्र जगदाळे यांनी संकलित केलेल्या शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन यानिमित्ताने भरवण्यात येणार आहे.
या संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे या संमेलनात १६० हूून अधिक कवींनी महाराष्ट्र भरातून सहभाग घेतला आहे. हे संमेलन विविध चार सत्रात मा.अनिल दिक्षीत,राज अहिरराव,सुरेश कंक,महेंद्रकुमार गायकवाड ह्या चार कवीसंमेलनांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
शेवटी या एक दिवसीय साहित्य संमेलनाचा समारोप सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुनील गोडबोले, समरसता क्षेत्र कार्यकारणी सदस्य, निलेशजी गद्रे यांच्या उपस्थितीत समारोप संपन्न होणार आहे. या समारोपाला ज्येष्ठ साहित्यीक बबन पोतदार, गोंदियाच्या कवयित्री किरण मोरे/चव्हाण,नाशिकचे शाहीर डॉ. भास्कर म्हरसाळे आणि पुण्यातील आत्मचरित्रकार दादासाहेब सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत.