पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची उचल बांगडी करून त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या आदेशाने राजेश पाटील यांची बदली करून त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात श्रावण हर्डीकर यांच्या जागी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली होती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृष्ण प्रकाश यांची बदली करण्यात आली. आता राज्यात शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात राजेश पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.