– मुंबईत आमदार महेश लांडगे यांचा बैठकांचा सपाटा
– विविध खात्यांच्या मंत्र्यांना निवेदनाद्वारे कार्यवाहीची मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवडमधील राज्य सरकारशी संबंधित प्रलंबित विषयांवर तोडगा काढून विकासकामांतील अडथळे दूर करावेत, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लांडगे यांनी बुधवारी भेट घेतली. यावेळी विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. ‘‘पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात अडथळा निर्माण होणार नाही. प्रशासकीय पातळीवर ताबडतोब कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
आमदार लांडगे म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रकल्प आणि विकासकामांबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सविस्तर निवेदन देण्यात आले. तसेच, संबंधित विभागाचे मंत्री दादा भुसे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्याशी विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प आणि विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास आहे.