पिंपरी, विश्व सह्याद्री ः पिंपरीतील कामगारनगर भागात असलेल्या डाॕ. बेक या रसायन उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या गोदामास शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली.
या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मात्र, सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हीआग लागली असूनही पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अग्नीशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.