Home Pune पद्मावती फाउंडेशनच्या वतीने रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर संपन्न

पद्मावती फाउंडेशनच्या वतीने रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर संपन्न

पद्मावती फाउंडेशनच्या वतीने रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर संपन्न<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

पुणे :  प्रतिनिधी

पद्मावती फाउंडेशनच्या माध्यमातून विजय बाळासाहेब दगडे यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २१३ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक स्मार्ट वॉच भेट देण्यात आले. तर नेत्र तपासणी शिबिराचा लाभ ६९१ जणांनी घेतला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ दगडे, माजी आमदार महादेव बाबर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे,मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, उद्योजक नंदलाल मौर्य, माजी नगरसेवक गणेश ढोरे, माजी नगरसेवक प्राची अल्हाट,पद्मावती फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय बाळासाहेब दगडे आदि मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान शिबिरा सोबतच या ठिकाणी नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या नेत्र तपासणी शिबिरात गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले, तसेच ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची गरज आहे अशा नागरिकांची मोफत शस्त्रक्रिया पद्मावती फाऊंडेशन च्या वतीने करण्यात येणार आहेत.

या सामाजिक उपक्रमांबद्दल बोलताना विजय दगडे म्हणाले, पद्मावती फाऊंडेशनच्या वतीने पिसोळी परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. आज आम्ही रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर घेतले त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांच्या सहकार्याने महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. या तीन उपक्रमांमुळे परिसरातील गरजूंना उपयोग झाला, पद्मावती फाऊंडेशन भविष्यात असे समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचेही दगडे यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here