लळित यांचे कुटुंब मूळचे कोकणातील. उदय लळित यांचे आजोबा सोलापुरात वकिली करण्यासाठी आले अन् लळित सोलापूरकर झाले. त्यांचे वडील उमेश लळित हेही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाधीश होते. भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून सोलापूरचे सुपुत्र उदय उमेश लळित हे नामनिर्देशित झाले असून, ऑगस्टमध्ये ते पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.