पुणे: नृत्य ही आनंदाची अभिव्यक्ति असून निरामय आरोग्य व व्यक्तिमत्व विकास यांची नृत्याद्वारे योग्य सांगड घातल्यास शरीराची व मनाची निगा उत्तम राखली जाते, असे मत नृत्याथी कलाक्षेत्रमच्या संचालिका व नृत्यगुरु राजसी वाघ यानी व्यक्त केले.
जागतिक नृत्यदिनानिमित नृत्यार्थी कलाक्षेत्रमतर्फे राजसी वाघ यानी ‘अलारिपु’ हा नृत्याविष्कार सादर केला. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी संस्थेच्या विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाल्या.
यावेळी अखिल भारतीय सांस्कृतिक संघाचे पदाधिकारी रत्ना वाघ, हेमंत वाघ व अन्य मान्यवर उपस्थित होते.