Home Entertainment नृत्यगुरु सुचेता भिडे चापेकर यांच्या पंचाहत्तरीनिमित्त ‘परंपरा’ भरतनाट्यम नृत्य कार्यक्रम ९ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये

नृत्यगुरु सुचेता भिडे चापेकर यांच्या पंचाहत्तरीनिमित्त ‘परंपरा’ भरतनाट्यम नृत्य कार्यक्रम ९ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये

0
नृत्यगुरु सुचेता भिडे चापेकर यांच्या पंचाहत्तरीनिमित्त ‘परंपरा’ भरतनाट्यम नृत्य कार्यक्रम ९ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

नासिक: प्रतिनिधी

कलावर्धिनी  संस्थेतर्फे नासिक मध्ये ‘ परंपरा ‘ या भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमाचे आयोजन ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नृत्य परंपरेतील तीन पिढया एकत्र येऊन नृत्य सादर करणार आहेत .नृत्यगुरू डॉ.सुचेता भिडे -चापेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम   सोमवार ९ ऑक्टोबर रोजी महाकवी कालिदास कला मंदीर, नाशिक येथे सायंकाळी ५ .३० वाजता होणार आहे. ‘ अड्डा स्टुडिओ ‘ यांच्या  सहकार्याने  हा कार्यक्रम होत आहे.

नृत्यगुरू डॉ.सुचेता भिडे -चापेकर, त्यांची कन्या अरूंधती पटवर्धन आणि नात सागरिका पटवर्धन नृत्य सादर करणार आहेत. भरतनाटयम च्या पारंपारिक रचना या तिघी सादर करणार आहेत. या  कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीत आणि भरतनाटयम यांचा संगम असलेल्या   ‘नृत्यगंगा’  या नवीन रचना सादर करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here