पिंपरी : राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर निगडी येथील ओझर्डे इन्स्टिट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन येथे रविवार (दि.11) रोजी (11 ते 1) व (2 ते 4) अशा दोन सेशन मध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ओझर्डे इन्स्टिट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशनचे संचालक, प्रा.भूषण ओझर्डे बुध्दिमत्ता व गणित विषयाचे मार्गदर्शन करणार आहेत. प्रा.भूषण ओझर्डे यांच्या इन्स्टिट्यूट मधून 700 हून अधिक शासकीय अधिकारी घडले आहेत. तर शाररिक चाचणी संदर्भात मार्गदर्शन एन.एस.पी.टी अकॅडेमी चे संचालक प्रा.कुमटाळे करणार आहेत.
तीन वर्षांनंतर पोलिस भरती प्रक्रिया जाहीर झाल्याने उमेदवारांमध्ये उत्साह आहे. कागदपत्रांची जमवाजमव, लेखी परीक्षेची तयारी, शारीरिक चाचणीची पूर्व कल्पना असावी व त्यासाठी कोणती तयारी केली पाहिजे या द़ृष्टीने या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा.भूषण ओझर्डे यांनी दिली. शिबिरात पोलिस भरतीचा अर्ज कसा भरावा, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात, त्याची छाननी कशी होते याची माहिती दिली जाणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किती प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. त्यासाठी गुण कसे दिले जातात याचे मार्गदर्शनदेखील केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची उंची, वजन तपासले जाईल. शारीरिक चाचणीत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी कोणकोणते शारीरिक व्यायाम केले पाहिजे, आहार काय असला पाहिजे याबद्दलही मार्गदर्शन केले जाणार आहे. लेखी परीक्षेसाठी कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करावा, किती गुणांचे प्रश्न असतात. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम व कमी वेळेत पेपर कसा सोडवला पाहिजे, या विषयाचे मार्गदर्शन केलेे जाणार आहे.
सोशल हॅंड्स फाउंडेशन सदर उपक्रमाचे आयोजक आहेत. यावेळी गणेश जगदाळे(सहाय्य्क पोलीस निरीक्षक,पुणे), हर्षल कामराज(सहाय्य्क पोलीस निरीक्षक,मुंबई), मंजुषा शेलार(सहाय्य्क पोलीस निरीक्षक,चिंचवड), अतुल क्षीरसागर(सहाय्य्क पोलीस निरीक्षक,चिंचवड) पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नोंदणीसाठी ऑनलाइन फॉर्मची सुविधा
हे शिबिर मोफत असून, या शिबिरात भाग घेण्यासाठी इच्छुक ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी करू शकतात. https://forms.gle/fwBnRtgXP2PiQ9Vf8 या संकेतस्थळावरून ऑनलाइन फॉर्म भरू शकतात किंवा ओझर्डे इन्स्टिट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन, म्हाळसाकांत चौका जवळ, प्राधिकरण,निगडी येथे ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकतात.