पिंपरी, दि. १ जानेवारी २०२४ :– पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नाशिक फाटा चौकातील पिंपळे गुरवकडून भारतरत्न जे.आर.डी. टाटा उड्डाणपूलावरून पुण्याकडे जाण्यासाठी खाली उतरणारा लूप बांधण्यात आलेला होता.सदरचा लूप निगडी दापोडी रस्त्यावर महामेट्रोचे काम चालू असल्याने आतापर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला होता. आता महामेट्रोचे काम पूर्ण झाले असल्याने आज १ जानेवारी २०२४ पासून हा लूप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप अभियंता विजयसिंह भोसले आणि भोसरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक साळुंखे आदी उपस्थित होते.या पूलामुळे वाहनांची कोंडी दूर होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याची माहिती सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली आहे.
Home Pimpri-Chinchwad नाशिक फाटा येथील भारतरत्न जे.आर.डी.टाटा उड्डाणपूलावरून पुण्याकडे खाली उतरणारा लूप वाहतुकीसाठी खुला…