![नाराज काँग्रेस नेते आबा बागुल फडणवीस यांच्या भेटीला<br />
<b>Deprecated</b>: strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />
नाराज काँग्रेस नेते आबा बागुल फडणवीस यांच्या भेटीला<br />
<b>Deprecated</b>: strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />](https://vishwasahyadri.com/wp-content/uploads/2024/04/images-8.jpeg)
पुणे: प्रतिनिधी
निष्ठावंतांना दाबून इतर पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदार रवींद्र धंगेकर यांना खासदारकीची उमेदवारी दिल्याबद्दल नाराज असलेले नगरसेवक आबा बागुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपूरला रवाना झाल्याचे वृत्त आहे. प्रत्यक्षात, बागुल यांनी आपण खाजगी कामासाठी नागपूर येथे आल्याचे सांगितले आहे.
तब्बल सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आबा बागुल लोकसभा निवडणूक उमेदवारीचे आग्रही दावेदार होते. मात्र, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघातच भाजपचा पाडाव करणाऱ्या धंगेकर यांनाच काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यानंतर संतप्त आबा बागुल यांनी, निष्ठावांतांना न्याय मिळणार नसेल तर भारत जोडो न्याय यात्रा काढून काय उपयोग, असा सवाल करीत खुद्द काँग्रेस भवन आताच आंदोलन केले. पक्षाच्या प्रदेश नेतृत्वावरही त्यांनी पक्षाच्या धोरणांना हरताळ फासल्याचे आरोप केले.
तेव्हापासूनच बागुल हे फडणवीस यांच्याशी संपर्कात असून ते काँग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार, अशा चर्चांना रंग आला होता. बागुल यांनी मात्र सातत्याने या बाबींचा इन्कार केला. निवडणुकीच्या तोंडावर बागुल हे नागपूरला रवाना झाल्याने या चर्चांना पुन्हा एकदा जोर चढला आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत बागुल अनुपस्थित राहिल्याने या चर्चेला अधिकच बळ मिळत आहे.