अपघात नसून घातपात असल्याची काँग्रेसला शंका
भंडारा: प्रतिनिधी
ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला असून त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मात्र, सुदैवाने या पगारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याची शंका काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या दौऱ्यावर असलेले पटोले यांच्या वाहनाला कारदा गावानजीक भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिली. या धडकेमुळे पटोले यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. मात्र, पटवले अथवा त्यांच्या सहकाऱ्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
निवडणुकीच्या काळात झालेला हा अपघात घातपात असल्याची शंका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून ही निवडणूक जिंकायची आहे का, असा सवाल लोंढे यांनी समाज माध्यमांद्वारे केला आहे