– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची सडकून टीका
– काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला काळे फासले
पिंपरी । प्रतिनिधी
स्वत:ला पुरोगामी म्हणून मिरवणारे काँग्रेसचे नेते सत्तेच्या हव्यासापोटी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह बोलत आहेत. देशाची सत्ता देशाच्या लोकांनी विश्वासाने मोदींच्या हातात दिली. त्यामुळे अस्वस्थ झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ घसरली आहे. आगामी काळात अहिंसावादी, पुरोगामी असल्याचा बढाया या नेत्यांनी पुढील काळात मारु नयेत, अशी टीका भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ‘‘ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरंत’’ असे संतापजनक भाष्य केल्यामुळे राज्यभरात भाजपाकडून निषेध केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने सोमवारी नाना पटोले यांच्या प्रतिमेला काळे फासले. यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, शहर महिलाध्यक्षा उज्वला गावडे, सरचिटणीस नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, नगरसेविका अनुराधा गोरखे, महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, वीणा सोनवलकर, बाळासाहेब भुंबे, ऋषिकेश रासकर, दिनेश यादव, शिवराज लांडगे, राहुल खाडे, पंकज शर्मा, तेजस खेडकर, वैशाली खाडे, कोमल शिंदे, विजय शिनकर, प्रदीप बेंद्रे, सुभाष सरोदे, कैलास सानप, मधुकर बच्चे, प्रदीप सायकर, संतोष तापकीर, विक्रांत गंगावणे, दीपक ढाकणे, गणेश जवळकर, रेखा कडाली, गीता महेंद्रु, आशा काळे, राधिका बोरलीकर, सोनम गोसावी, तेजस्विनी कदम, ज्योती खेसे, प्रियांका शाह, अतुल बोराटे, सतीश नागरगोजे, ज्योती खंडारे, शुभांगी कसबे आदी उपस्थित होते.
यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘‘नाना पटोले हाय, हाय, नाना पटोलेंचे करायचं काय, खाली डोकं, वर पाय’’ अशा घोषणा दिल्या..
नाना पटोले यांच्यावर कारवाई करा : आमदार लांडगे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देशाच्या सर्वोच्च पंतप्रधानपदाचा अवमान करीत आहेत. यापूर्वीही अनेकदा त्यांची जीभ घसरली आहे. भाजपाने आतापर्यंत सनदशीर मार्गाने आंदोलन करून आपला निषेध नोंदवला आहे. मात्र, पटोले बेलगाम झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने पटोले यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आगामी काळात भाजपाचे कार्यकर्ते पटोलेंविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील, असा इशाराही आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.