पिंपरी :- पिंपरीतील नगरसेवक संदीप वाघेरे यांचे मातोश्री सौ.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांचे मंगळवार ( दि. 25 ) रोजी खाजगी रुगणालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांचे वय 72 होते. उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती बाळकृष्ण वाघेरे, तीन मुले प्रदीप वाघेरे, माणिक वाघेरे, संदीप वाघेरे ,मुलगी संगीता मुरकुटे,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक 31/01/2022 रोजी पवना नदी घाट पिंपरी वाघेरे येथे सकाळी ८ वाजता होणार आहे. ह.भ.प. साध्वी वैष्णवी सरस्वती आळंदी देवाची यांची प्रवचन सेवा होणार आहे.