Home Breaking News देशात सर्वात मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याचा कट उघड

देशात सर्वात मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याचा कट उघड

देशात सर्वात मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याचा कट उघड

पुणे शहर बनविले होते कारवायांच्या नियोजनाचे केंद्र

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

देशातील विविध महत्त्वाच्या शहरांमध्ये आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षा मोठे दहशतवादी हल्ले घडविण्याचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा कट उघड झाला आहे. या दहशतवादी गटांनी पुणे शहराला दहशती कारवायांचे केंद्र बनविले असल्याचेही उघडकीला आले आहे.

मुंबईच्या नरिमन हाऊस, गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणांसह देशभरातील अनेक लष्करी तळ दहशतवाद्यांच्या निशाणावर होते. अनेक लष्करी तळांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याची छायाचित्र या दहशतवाद्यांनी पाकिस्तान आणि सीरियाला पाठवली असल्याचे जेरबंद करण्यात आलेल्या एका दहशतवाद्याच्या कबुली जबाबातून स्पष्ट झाले आहे.

शहानवाज असे अटक करण्यात आलेल्या अतिरेक्याचे नाव असून त्याची पत्नी मुळची हिंदू आहे. तिने धर्मांतर करून शहानवाज बरोबर लग्न केले. लग्नानंतर ती देखील शहानवाज बरोबर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाली आहे. या दोघांची भेट अलीगड मुस्लिम विद्यापीठात झाली आहे.

झटपट पैसे कमावण्यासाठी शहानवाजने सुरुवातीच्या काळात ७ ते ८ गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर तो जिहादी विचारातून दहशतवादी चळवळीत सहभागी झाला. अन्वर अवलाकी हा इसिसचा एक महत्त्वाचा म्होरक्या अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी आपल्या कारवाईत यम सदनी पाठविले. हाच अन्वर शहानवाजचा दहशतवादातील गुरु होता. अलिगड मुस्लिम विद्यापीठातील काही विद्यार्थी दहशतवादी गटांची संबंधित असल्याची शंका असल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांच्यावर नजर ठेवली होती. याच कारवाईत शहानवाजला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उघड झाला आहे.