
पिंपरी, दि. ७ – आमदार व माजी राज्यमंत्री सुरेश धस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार नानासाहेब नवले, भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवडचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. जगताप यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून सांत्वन केले.
लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल राज्यभरातील सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक, धार्मिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दुःख व्यक्त होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना अभिवादन करत श्रद्धांजली वाहत आहेत.
शनिवारी आमदार व माजी राज्यमंत्री सुरेश धस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार नानासाहेब नवले, भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला अभिवादन करत श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून सांत्वन केले. यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, मुलगी ऐश्वर्या रेणुसे-जगताप, बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप, बहिणी, जावई, पुतणे, नातवंडे उपस्थित होते.