Home Entertainment ‘दिल एक मंदिर’ चित्रपटाची घोषणा, उद्योजक अशोक नाईकरे यांचे चित्रपटनिर्मितीत पदार्पण

‘दिल एक मंदिर’ चित्रपटाची घोषणा, उद्योजक अशोक नाईकरे यांचे चित्रपटनिर्मितीत पदार्पण

‘दिल एक मंदिर’ चित्रपटाची घोषणा, उद्योजक अशोक नाईकरे यांचे चित्रपटनिर्मितीत पदार्पण<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

पुणे : प्रतिनिधी

हिंदी चित्रपट क्षेत्रात आपला दैदिप्यमान इतिहास निर्माण करणारे स्वर्गीय राज कपूर साहेब यांना आपला आदर्श मानणारे, ऋषिकेश मुखर्जी (ऋषीदा)यांचे चाहते आणि आपल्या आवाजाची जादू अजरामर करणारे रफी साहेब यांचा आशीर्वाद लाभलेले प्रसिद्ध उद्योजक, निर्माता अशोक नाईकरे एक नवी कोरी कलाकृती घेवून लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहेत. सागर फिल्म्स निर्मित आणि अशोक नाईकरे दिग्दर्शित ‘दिल एक मंदिर’ या हिंदी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून मल्टी स्टारर असणाऱ्या या चित्रपटाच्या संहितेचे नुकतेच विधीवत पूजन करण्यात आले.

हा एक हृदयस्पर्शी वास्तववादी चित्रपट असून चित्रपटसृष्टीत एक माईलस्टोन ठरेल, अशी भावना निर्माते दिग्दर्शक अशोक नाईकरे यांनी व्यक्त केली. मायबाप रसिक प्रेक्षकांच्या भेटीला हा चित्रपट लवकरच येत आहे. सदर चित्रपटाची कथा अशोक नाईकरे यांची असून पटकथा, संवाद लेखन आबा गायकवाड यांनी केले आहे.

चित्रपट संहिता पूजन प्रसंगी चित्रपट अभ्यासक राज काजी, निर्मिती प्रमुख विनोद धोकटे, शाम पुणेकर, हरीश धोंगडे, स्वप्नील वेंगुर्लेकर, नाना खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

चित्रपटाच्या चित्रीकरणास 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सुरुवात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here