पिंपरी – दिघी, भोसरी येथील आर्मी पब्लिक स्कूल मध्ये नुकतेच ‘सदर्न कमांड प्रिंसिपल मिट’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘रोबोटिक्स सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ शाळांमध्ये शिकवण आणि इतर शैक्षणिक विषयांवर तज्ज्ञांनी ऊहापोह केला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया, चीफ ऑफ स्टाफ मुख्यालय सदर्न कमांड आणि अध्यक्ष बोर्ड ऑफ एडमिनिस्ट्रेशन, मेजर जनरल योगेश चौधरी, एम जी एडम, मेजर जनरल आर के रैना आणि सदर्न कमांडच्या अंतर्गत येणाऱ्या आर्मी पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आर्मी पब्लिक स्कूल सदर्न कमांड मध्ये साठ हजाराहूनअधिक विद्यार्थी शिक्षणाचा लाभा घेतात व अडीच हजार शिक्षक सेवा पुरावितात.
ब्रिगेडियर दिलीप गणेश पटवर्धन, कमांडंट बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप, अध्यक्ष एपीएस दिघी यांनी प्रमुख पाहुण्याांचे स्वागत केले. लेफ्टनंट जनरल अरविन्द वालिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .
कर्नल (सेवानिवृत्त निर्देशक) अनुपम माथुर यांनी ‘कमांड प्रिंसिपल्स मीट 2022’ चे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रम, संकल्पनात्मक आणि व्यावहारिक समजून घेण्यासाठी केंद्रीकृत शिक्षण प्रणालीचा विकास करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी ही मनोगत व्यक्त केले. प्राचार्या यस्मिन कौर यांनी सूत्रसंचालन तर मेजर जनरल योगेश चौधरी यांनी आभार मानले.