Home Politics … त्यांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू: संजय राऊत यांना श्रीकांत शिंदे यांचे प्रत्युत्तर

… त्यांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू: संजय राऊत यांना श्रीकांत शिंदे यांचे प्रत्युत्तर

… त्यांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू: संजय राऊत यांना श्रीकांत शिंदे यांचे प्रत्युत्तर

ठाणे: प्रतिनिधी

सध्या काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांनी तातडीने चांगला डॉक्टर बघावा आणि स्वतःवर उपचार करून घ्यावे. त्यांच्या उपचाराचा खर्च आम्ही आमच्या वैद्यकीय कक्षातून करू, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. पत्राचाळ आणि खिचडी घोटाळ्यातील पैशातून कोणाला उपचारासाठी अथवा एखाद्या विद्यार्थ्याला पाच पैशाची मदत केली आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशन ला मिळालेल्या देणग्या आणि त्यांचे आर्थिक व्यवहार याची चौकशी करावी अशी मागणी करणारे पत्र राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. त्यात करण्यात आलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांवर शिंदे यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. आपण करीत असलेल्या चांगल्या कामाची माहिती आपल्या पत्रातून पंतप्रधानांना दिल्याबद्दल राऊत यांना उपरोधिकपणे धन्यवाद देतानाच, राऊत यांचा पंतप्रधानांवरील विश्वास वाढत आहे, अशी टिप्पणी ही त्यांनी केली.

ज्यांच्या वर पत्राचाळ घोटाळ्याचे आरोप आहेत, जे तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत, खिचडी घोटाळ्यातील पैसे ज्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर जमा झाले आहेत तेच लोक आमच्यावर आरोप करून पंतप्रधानांना पत्र लिहीत आहेत अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांनी त्वरित उपचार घ्यावे, असा सल्ला आपण डॉक्टर म्हणून देत आहोत, असेही