Home Entertainment तुझे नृत्य पाहताना माझ्या चेहऱ्यावरचे हसू मावळत नाही: मलाइकाने केले संगीता फोगटचे कौतुक

तुझे नृत्य पाहताना माझ्या चेहऱ्यावरचे हसू मावळत नाही: मलाइकाने केले संगीता फोगटचे कौतुक

तुझे नृत्य पाहताना माझ्या चेहऱ्यावरचे हसू मावळत नाही: मलाइकाने केले संगीता फोगटचे कौतुक<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

‘झलक दिखला जा’ मध्ये संगीता फोगाटचे कौतुक करताना मलाइका अरोरा म्हणाली, “तू डान्स करतेस, तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचे हसू मावळतच नाही”

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखला जा’ या सेलिब्रिटी डान्स रियालिटी शोमध्ये सर्व स्पर्धक नव्या वर्षाचे थाटात स्वागत करताना आपले कसब पणाला लावतील आणि जबरदस्त परफॉर्म करताना दिसतील. या ‘न्यू इयर स्पेशल’ भागात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे आणि सेलिब्रिटी स्पर्धक कोरिओग्राफर्सच्या ‘अदलाबदली’चे अनोखे आव्हान स्वीकारताना दिसतील. स्पर्धकांची जोडी एका नव्या कोरिओग्राफरसोबत जुळवण्यात येईल. हा नवीन कोरिओग्राफर त्यांना नवीन रूपात आणि नवीन शैलीत सादर करेल आणि त्यांच्या प्रतिभेचा नवीन पैलू प्रेक्षकांना दिसेल.

नववर्षाच्या सोहळ्यात सामील होऊन या भागाची रंजकता वाढवण्यासाठी सुपरस्टार सिंगरचे कॅप्टन – पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सलमान अली, सायली कांबळे आणि मोहम्मद दानिश या भागात विशेष उपस्थिती नोंदवणार आहेत. या भागात एक रोचक ट्विस्ट देखील असणार आहे- ही स्पर्धा आता आणखी तीव्र होणार आहे कारण वाइल्ड कार्ड स्पर्धकांची नावे निर्माते जाहीर करणार आहेत- हे स्पर्धक आहेत – अवेझ दरबार, धनश्री वर्मा, मनीषा रानी आणि निखिता गांधी.

‘झलक दिखला जा’ चा ‘डान्सचा आखाडा’ जिंकणारी प्रतिभावान संगीता फोगाट कोरिओग्राफर विवेक चचेरेसोबत ‘चिकनी चमेली’ वर जबरदस्त मूव्ह्ज दाखवून पुन्हा एकदा सर्वांना थक्क करून सोडेल. तिचा तो नवीन ‘अवतार’, तिचे ठुमके आणि अप्रतिम हावभाव यांनी प्रभावित झालेली परीक्षक मलाइका अरोरा संगीताचे कौतुक करताना म्हणाली, “खूप छान नाचली तू. कित्ती गोड दिसतेस तू संगीता! अप्रतिम परफॉर्मन्स! तू उत्तम नाचलीस. मला खूप मजा आली. म्हणजे, तू जेव्हा डान्स करत असतेस तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचे हसू मुळी मावळतच नाही. मला खूप आवडला हा डान्स.”

मलाइकाला पुस्ती जोडत परीक्षक अर्शद वारसी म्हणाला, “तू खूप गोड आणि छान डान्सर आहेस. तू जेव्हा डान्स सुरू करतेस, तेव्हा सुरुवातीला काही क्षण आम्ही स्तब्ध होऊन जातो. तुझ्यातला गोडवा तुझ्या हालचालींत दिसतो. तू जे काही करतेस ते फार गोड दिसते. खूपच गोड. उत्कृष्ट कोरिओग्राफी. विवेक तुला हे छान जमते. तू सेलिब्रिटीच्या स्वभावाला आणि व्यक्तिमत्त्वाला धरून कोरिओग्राफी करतोस. ते पाहताना खूप आनंद मिळतो. खूप मजा आली, शाब्बास!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here