Home Pune ‘तालविश्व’च्या वतीने ‘संगीत विरासत’ कार्यक्रमाचे आयोजन

‘तालविश्व’च्या वतीने ‘संगीत विरासत’ कार्यक्रमाचे आयोजन

‘तालविश्व’च्या वतीने ‘संगीत विरासत’ कार्यक्रमाचे आयोजन<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

– उस्ताद मेहबूबखाँसाहेब मिरजकर यांचा ५८ व्या तसेच उस्ताद महंमद हानिफखाँसाहेब मिरजकर यांच्या ९व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

–  युवा तबला वादक ओजस आडीया यांना ‘तालविश्व युवा पुरस्कार’ जाहीर 

– ‘स्वर- तालाचा’ एका अनोखा अविष्कार ‘स्व-ह्रिदम’  

पुणे : प्रतिनिधी

उस्ताद मेहबूबखाँसाहेब मिरजकर यांचा ५८ व्या तसेच उस्ताद महंमद हानिफखाँसाहेब मिरजकर यांच्या ९ व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ‘संगीत विरासत’ या कार्यक्रमाचे आयोजन तालविश्वच्या वतीने रविवार २४ डिसेंबर २०२४ रोजी सायं ५.३० वाजता, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात येणार असल्याची माहिती, ‘तालविश्व’चे संचालक नवाझ मिरजकर यांनी दिली.

गेल्या ९ वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गुरुजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ तथा ‘तालविश्व’च्या युवा तबला वादकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देश्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाची सुरुवात युवा तबला वादकांच्या वादनाने करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे, नवाज मिरजकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘स्वर- तालाचा’ एका अनोखा वाद्यवृंद अविष्कार ‘स्व-ह्रिदम’. यात बॉम्बे आनंद (वायोलिन), महेश परमेश्वरण (मृदंगम), सुनील अवचट (बासरी), कुमार कातिंगेसु (सतार), नागेश अड़गांवकर (गायन), रोहित कुलकर्णी (सिंथेसाइज़र की -बोर्ड) व  नवाज़ मिरजकर (तबला) यांची जुगलबंदी रंगणार आहे. तसेच सुप्रसिद्ध युवा तबला वादक ओजस आडीया यांचे एकल तबला वादनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

‘तालविश्व’च्या वतीने उस्ताद महंमद हानिफखाँसाहेब मिरजकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युवा तबला वादक ओजस आडीया यांना ‘तालविश्व युवा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, उबाठा गटाचे सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, प्रसिद्ध उद्योजक सुनील मारणे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, ‘तालविश्व’चे संचालक रिझवान मिरजकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here