आयात नेत्यांना उमेदवारी दिल्यामुळे पावसकर संतापले
मुंबई: प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना सच्चा शिवसैनिकांची निवड करण्याऐवजी इतर पक्षातून आयात केलेल्या नेत्यांनाच उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खरा धूर्त चेहरा उघड झाला असून आता उरलेस उरले शिवसैनिकही शिवसेना ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करतील, असा इशारा शिवसेनेचे माजी प्रवक्ते किरण पावसकर यांनी दिला आहे.
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणूक लढविलेल्या आणि त्यानंतर पराभूत होऊन शिवसेनेत आलेल्या वैशाली दरेकर यांना कल्याणमधून ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. नुकतेच भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात आलेले उन्मेश पाटील यांचे समर्थक करण पवार यांना जळगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीच्या कट्टर शिवसैनिकांना डावलून त्या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेत येऊन आठवडा होत नाही तोवर त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.
डिसेंबर महिन्यात शिवसेनेत प्रवेश करणारे संजोग वाघेरे यांना तीन महिन्यात मावळची उमेदवारी मिळाली तर भाजपमधून शिवसेनेत आलेले भाऊसाहेब वाघचौरे यांना शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. ईशान्य मुंबई मतदार संघातही राष्ट्रवादी काँग्रेस मधून आयात करण्यात आलेले संजय दिना पाटील यांना उमेदवारी बहाल करण्यात आली, अशी आयात उमेदवारांची यादीच पावसकर यांनी जाहीर केली आहे.
मूळ शिवसैनिकांना डावलून आयात नेत्यांना उमेदवारी देण्याच्या धोरणामुळे शिवसैनिकांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. असे नाराज शिवसैनिक