Home Pune City तरुणीचा जीव वाचविणाऱ्या लवलेशचे पालकत्व राष्ट्रीय समाज पक्षाने स्वीकारले

तरुणीचा जीव वाचविणाऱ्या लवलेशचे पालकत्व राष्ट्रीय समाज पक्षाने स्वीकारले

तरुणीचा जीव वाचविणाऱ्या लवलेशचे पालकत्व राष्ट्रीय समाज पक्षाने स्वीकारले

मुख्यमंत्र्यांनी देखील पालकत्व स्वीकारावे: जानकर

पुणे : प्रतिनिधी

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या तरुणाला धाडसाने लेशपाल जवळगेन रोखले व तरुणीचा प्राण वाचविला. राज्यातून लेशपाल जवळगेचं कौतुक असताना राष्ट्रीय समाज पक्षाच्या महिला अध्यक्षा सुनीता किरवे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे लेशपाल जवळगे याचा अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष महादेव जानकर यांनी लेशपाल जवळगे याच्या धाडसाचं कौतुक करून त्याने यूपीएससीत यश मिळवावे अशी आशा व्यक्त केली. आपल्या पक्षाने लेशपालचे पालकत्व स्वीकारले असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी देखील यांनी लेशपाल जवळगे याचे पालकत्व स्वीकारावे यासाठी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

सदर कार्यक्रमाला राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, सचिव सचिन गुरव, पुणे शहर महिला अध्यक्षा सुनीता किरवे, पुणे शहर अध्यक्ष बालाजी पवार, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भरत भैय्या महानवर व मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.