पुणे : आज 27 जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध लेखक डॉ. अनिल अवचट यांचे निधन झाले.
मराठी पत्रकारितेला डॉ. अनिल अवचट उर्फ बाबा यांनी रिपोर्ताज या महत्त्वपूर्ण प्रकाराची नव्याने ओळख करून दिली. त्यांनी लिहलेल्या लिखाणाचे पडसाद समाजमानसावर उमटून अनेक आंदोलने, चळवळी उभ्या राहिल्या. पत्रकारितेबरोबरच सामाजिक कामात तसेच अनेक कलांच्या क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.