Home Uncategorized डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आज

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आज

0
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आज<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

मुंबई : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचं गाव भिलार महाबळेश्वर येथे शनिवार दि २९ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे. 

या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार असून या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील तर स्वागताध्यक्षपदी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, स्वागत कार्याध्यक्षपदी सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली. 

या अधिवेशनासाठी संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्यासह सोलापूर येथून प्रशांत कटारे, रामकृष्ण लांबतुरे, विकास कस्तुरे, परशुराम कोकणे, अभिषेक आदेप्पा, शरद पोतदार, इम्रान सगरी, विक्रम इंगळे, शाहनवाज शेख, सत्यनारायण गड्डम, सचिन जाधव, आकाश नवले आदी पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले आहेत.

यावेळी संघटनेच्यावतीने राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पत्रकारितेमध्ये दिवसेंदिवस मोठा बदल होत असून सध्या डिजिटल मीडियाचे  महत्त्व वाढले आहे. मेट्रोसिटीपासून खेडेगावापर्यंत सध्या डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या प्रचंड वाढली आहे. राज्यातील डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना एकत्र करून ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली. सध्या डिजिटल मीडियामधील सर्व देशातील सर्वात मोठी संघटना म्हणून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा उल्लेख होतो वेब पोर्टल, युट्युब व इतर डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना योग्य ते न्याय मिळावा व शासनाने याची दखल घ्यावी यासाठी ही संघटना अहोरात्र झटत असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचे गाव भिलार महाबळेश्वर येथे होणार असून या अधिवेशनासाठी राज्यभरातून संपादक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात ‘डिजिटल मीडिया नवे माध्यम’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे.‌ या परिसंवादामध्ये जलतज्ञ अनिल पाटील, एडव्होकेट अतुल पाटील, प्राध्यापक विशाल गरड, माहिती जनसंपर्क पुणे विभागचे उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम उर्फ राजू पाटोदकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये कराड येथील डॉ. सुरेश भोसले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, निर्माता दिग्दर्शक मंगेश देसाई, श्रीमती चेतना सिन्हा,
दिग्दर्शक बापूराव कऱ्हाडे, उस्मानाबाद येथील डॉ. प्रतापसिंह पाटील, सिंधुदुर्गचे अच्युत सावंत, सोलापूरचे श्रीकांत मोरे, नागपूर येथील डॉ. संजय उगेमुगे यांचा सन्मान होणार आहे. यासह  विशेष सन्मान म्हणून पत्रकार दीपक भातुसे, युवा उद्योजक गणेश राऊत, पाचगणीच्या नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर, कोल्हापूर येथील यशवंत पाटील, सातारा जिप उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, सामाजिक कार्यकर्ते सरदार पांडुरंग बंगे, सामाजिक कार्यकर्ते संताजी घोरपडे, सांगोल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, प्राथमिक शिक्षक हणमंत काटकर, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे -पाटील, उद्योजक लालासाहेब शिंदे, परतवडी येथील नरसिंग दिसले, शिक्षणाधिकारी किरण लोहार, उद्योजक मनीषा मुळीक यांना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here