Home Maharashtra Special टाटा मोटर्स कुपोषणाविरोधात लढण्‍यासाठी समुदायांना सक्षम करत आहे ,दृढनिश्‍चय व परिवर्तनाची कथा

टाटा मोटर्स कुपोषणाविरोधात लढण्‍यासाठी समुदायांना सक्षम करत आहे ,दृढनिश्‍चय व परिवर्तनाची कथा

0
टाटा मोटर्स कुपोषणाविरोधात लढण्‍यासाठी समुदायांना सक्षम करत आहे ,दृढनिश्‍चय व परिवर्तनाची कथा<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

पुणे – पुण्‍यातील मोठ्या प्रमाणात वंचित व्‍यक्‍ती राहणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्‍ये 2014 पासून बाल कुपोषण व दारिद्र्यते विरोधातील मूक संघर्ष सुरू आहे. सामाजिक जबाबदारीप्रती कटिबद्धतेसाठी ओळखणारी जाणारी टाटा मोटर्स या परिवर्तनात्‍मक बदलामागे प्रेरकशक्‍ती आहे.

समाजातील सर्वात वंचि7त व्‍यक्‍तींना सक्षम करण्‍याचे, तसेच त्‍यांना बाल कुपोषणाविरोधात शाश्‍वत पद्धतीने लढण्‍यास मदत करण्‍याचे मिशन आहे. या उपक्रमामधील उल्‍लेखनीय कम्‍युनिटी लिंक वर्कर (सीएलडब्‍ल्‍यू) समीना शेख या आशेचा किरण ठरल्‍या आहेत. त्‍यांनी कुपोषित मुलांच्‍या मातांना गरिबी व कुपोषणाच्‍या दुष्‍टचक्रामधून बाहेर पडण्‍यास मदत करण्‍यासाठी सक्षम करण्‍याची गरज ओळखली. समीना यांनी कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले.

सर्व कुपोषित मुलांच्‍या माता आलेल्या पाच महिलांना ओळखत समीना यांचा या उपक्रमाच्‍या दिशेने प्रवास सुरू झाला. सूक्ष्‍म उद्योगाप्रती या महिलांमधील क्षमतांना पाहून त्‍यांनी आव्‍हानात्‍मक प्रवास सुरू केला. समीना यांनी काळजीपूर्वक त्‍यांची कागदपत्रे गोळा केली, नोकरशाहीसंदर्भातील अडथळ्यांना दूर केले आणि त्‍यांचे अर्ज भरले. यामध्‍ये त्‍यांना घवघवीत यश मिळाले. जवळपास 30 पात्र महिलांना त्‍यांचे घरगुती व्‍यवसाय सुरू करण्‍यासाठी जवळपास प्रत्‍येकी 10 हजार रूपयांचे आर्थिक साह्य मिळाले.

या परिवर्तनात्‍मक उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सची सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्‍हणाले, समीना शेख यांची समर्पितता आणि या उपक्रमाच्‍या यशामधून सक्षमीकरणाची परिवर्तनात्‍मक क्षमता दिसून येते. टाटा मोटर्समध्‍ये आमचा आमच्या सीएसआर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍ती व समुदायांवर सखोल व दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्‍यावर विश्‍वास आहे. समीना यांच्‍या कार्यामधून समाजात स्थिरता, स्‍वावलंबीपणा व सकारात्‍मक परिवर्तन घडवून आणण्‍याप्रती आमची कटिबद्धतादिसून येते.

या सक्षम लाभार्थी आता बांगड्यांची दुकाने, मासे विक्रेते, भाजीपाला विक्रेते व फुलांची दुकाने असे लघुस्‍तरीय उद्योग सुरू करण्‍यास सुसज्‍ज आहेत. या आर्थिक सक्षमीकरणामुळे या कुटुंबांना दारिद्र्यतेमधून बाहेर पडण्‍यासह स्थिर करत कुपोषणाविरोधात लढण्‍यास मदत झाली आहे. आज आमच्‍या प्रकल्‍पांतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील ९६ टक्‍क्‍यांहून अधिक कुपोषित मुले स्वस्थ झाली आहेत, ज्‍यांच्‍यामध्‍ये उत्तम मोटर स्किल्‍स व उल्‍लेखनीय आकलन क्षमता दिसून येत आहे.

यांसारख्‍या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून टाटा मोटर्स एका वेळी एका सक्षम व्‍यक्‍तीसह समाजात सकारात्‍मक बदल घडवून आणण्‍याप्रती उत्‍प्रेरक म्‍हणून कायम प्रयत्नरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here