ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचं काल पुण्यात रूबी हॉस्पिटल मध्ये निधन झालं. त्यांच्यावर आज पुण्यातल्या वैंकुठ स्मशानभूमी इथं विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि बाबा रामदेव उपस्थित होते.
राहुल बजाज यांचं पार्थिव त्यांच्या पिंपरी-चिंचवड येथील निवासस्थानी आणण्यात आलं होतं. तिथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बजाज यांचे मित्र शरद पवार हे देखील उपस्थित होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनीही बजाज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे कामगारांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी मोठ्या प्रमाणावर कामगार आले होते. तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी देखील अंत्यदर्शन घेतलं. छगन भुजबळ, रघुनाथ माशेलकर, दिलीप वळसे पाटील आदींनी राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तर