
पिंपरी : अनेक साध्या शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य मार्गदर्शन व दिशा मिळत नाही. ती योग्य दिशा मिळावी हा मुख्य उद्देशाने ही मार्गदर्शन शिबिरे ओझर्डे इन्स्टिट्यूट तर्फे नेहमी घेण्यात येतात असे प्रतिपादन प्रा.भूषण ओझर्डे ( शिक्षण तज्ञ, संचालक, ओझर्डे इन्स्टिट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन ) यांनी केले. रुपीनगर, येथील ज्ञानदीप शाळेमध्ये जिथे अतिशय कष्टकरी , कामगार घरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे, तिथं पाचवी आणि आठवीच्या राज्य स्कॉलरशिप परीक्षेत बसलेल्या मुलांना चार तासाचे मोफत विशेष मार्गदर्शन शिबिर प्रा.ओझर्डे यांनी घेतले.
सदर करिअर मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मुख्याध्यापक सुबोध गलांडे, संस्था कार्याध्यक्ष सुधाकर दळवी, सचिव सूर्यकांत भसे, गणित विषय शिक्षिका सौ.पी एस.शेळकंदे, इंग्लिश विषय शिक्षिका कु.जे.टी. औटी उपस्थित होते. यावेळी चौथीच्या आणि आठवीच्या राज्य स्कॉलरशिप परीक्षेत बसलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
प्रा.भूषण ओझर्डे यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांची संवाद साधत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांना शालेय जीवनापासून यशस्वी होण्यासाठी तसेच विविध स्पर्धा परीक्षा देण्यासाठी शालेय जीवनापासूनच कोणती तयारी करावी, अभ्यासाचे नियोजन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थांची प्रेरणादायी उदाहरणे देत विध्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला.
करिअर गायडन्स ची महाराष्ट्रभर 400 पेक्षा जास्त व्याख्याने प्रा. भूषण ओझर्डे यांनी विना मोबदला दिली आहेत. अगदी डी वाय पाटील पासून सिंहगड कॉलेज पर्यंत सर्व मोठ्या महाविद्यालयात, लातूर पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुलांना करियर संदर्भात मोफत मार्गदर्शन त्यांनी केले आहे. मावळाची जिल्हा परिषद च्या शाळा, कामशेतचे पंडित नेहरू विद्यालय, रामकृष्ण मोरे कॉलेज, प्रतिभा कॉलेज पासून अनेक ठिकाणी व्याख्याने त्यांनी दिली आहेत. साध्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि पालकांना, अनेक शिक्षकांनाही यासंदर्भात माहितीची खूप कमतरता आढळते त्या ठिकाणी प्रा. भूषण ओझर्डे आवर्जून उपस्थित राहत असतात. त्यांच्या ओझर्डे इन्स्टिट्यूट चे 700 पेक्षा जास्त विद्यार्थी हे अधिकारी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सिलेक्ट झाले आहेत.